फलटण नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननीत 107 नगरसेवक आणि 4 नगराध्यक्ष उमेदवारी अर्ज वैध**

0
81
फलटण नगरपरिषद निवडणूक 2025 : छाननीत 107 नगरसेवक आणि 4 नगराध्यक्ष उमेदवारी अर्ज वैध**

फलटण :-  फलटण नगरपरिषद निवडणूक 2025 साठी झालेल्या छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 8 अर्जांपैकी 4 अर्ज वैध ठरले आहेत. तसेच नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 187 अर्जांपैकी 107 अर्ज वैध ठरले. ही माहिती प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव आणि नगरपरिषद प्रशासक निखिल जाधव यांनी दिली. छाननीची प्रक्रिया 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषद सभागृहात पार पडली.

प्रभाग क्र. 1 मध्ये दाखल झालेल्या 14 अर्जांपैकी 2 अवैध ठरले. येथे शिवसेनेच्या सुमन पवार आणि लक्ष्मी आवळे यांच्यासह अपक्ष सोमाशेठ जाधव आणि विक्रम जाधव या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. प्रभाग क्र. 2 मधील 19 अर्जांपैकी 11 अवैध ठरले असून शिवसेनेच्या आरती रणदिवे आणि अनिकेत अहिवळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस- महायुतीच्या सुपर्णा अहिवळे आणि मीना काकडे यांच्या अर्जांना मान्यता मिळाली आहे.

प्रभाग क्र. 3 मध्ये 21 पैकी 13 अर्ज अवैध ठरले. येथे पूनम भोसले आणि सुषमा ननावरे (शिवसेना), सुलक्षणा सरगर (भाजप), सचिन अहिवळे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि सुनील निकुटे (राष्ट्रीय काँग्रेस) उमेदवार आहेत. प्रभाग क्र. 4 मधील 14 पैकी 5 अर्ज अवैध ठरले असून शिवसेनेच्या रुपाली जाधव, अझरुद्दिन शेख, भाजपचे राहुल निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या हेमलता नाईक रिंगणात आहेत.

प्रभाग क्र. 5 मधील 12 पैकी 5 अर्ज अवैध ठरले. येथे शिवसेनेचे विजय लोंढे, सुरेखा व्हटकर, भाजपचे रोहित नागटिळे, कांचन व्हटकर तसेच शिवसेना उभाठाच्या योगेश्वरी खंदारे आणि शुभांगी गायकवाड उमेदवार आहेत. प्रभाग क्र. 6 मधील 6 अर्जांपैकी 2 अवैध ठरले असून शिवसेनेचे दीपक कुंभार, भाजपच्या अमिता जगदाळे आणि राष्ट्रवादीच्या मंगलादेवी नाईक-निंबाळकर व किरण राऊत यांच्यात लढत आहे.

प्रभाग क्र. 7 मध्ये 14 पैकी 7 अर्ज अवैध ठरले. येथे शिवसेनेचे पांडुरंग गुंजवटे, श्रीदेवी कर्वे, भाजपचे अशोकराव जाधव, स्वाती भोसले तसेच कृष्णा-भीमा विकास आघाडीचे मयूर गुंजवटे आणि शिवसेना उभाठाच्या लता तावरे उमेदवार आहेत. प्रभाग क्र. 8 मध्ये 13 पैकी 5 अर्ज अवैध ठरून शिवसेनेच्या सुवर्णा खानविलकर, विशाल तेली, भाजपच्या सिद्धाली शहा, फिरोज आतार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शीतल निंबाळकर रिंगणात आहेत.

प्रभाग क्र. 9 मध्ये 20 पैकी 9 अर्ज अवैध ठरले असून राष्ट्रीय काँग्रेसचे पंकज पवार, अपक्ष कविता मदने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रझिया मेटकरी, अमोल भोईटे उमेदवार आहेत. प्रभाग क्र. 10 मध्ये 15 पैकी 4 अवैध अर्ज ठरले. येथे शिवसेनेचे गणेश शिरतोडे, श्वेता तारळकर, कृष्णा-भीमा आघाडीचे विशाल पवार, भाजपचे अमित भोईटे, रेहाना मोमीन आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मोनिका गायकवाड यांच्या अर्जांना मान्यता मिळाली आहे.

प्रभाग क्र. 11 मध्ये 10 पैकी 2 अर्ज अवैध ठरले. येथे शिवसेनेचे दादासाहेब चोरमले, प्रियांका निकम, भाजपचे संदीप चोरमले, प्रियदर्शनी भोसले आणि अपक्ष अमीरभाई शेख यांची नावे रिंगणात आहेत. प्रभाग क्र. 12 मध्ये 13 पैकी 7 अर्ज अवैध झाले असून शिवसेनेचे विकास काकडे, स्मिता शहा, भाजपचे अरुण खरात, स्वाती फुले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नताशा पवार यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

प्रभाग क्र. 13 मध्ये 18 पैकी 8 अर्ज अवैध ठरले असून राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, दोन अपक्ष उमेदवार, कृष्णा-भीमा आघाडीच्या सानिया बागवान, भाजपच्या मोहिनी हेंद्रे व रुपाली सस्ते, राष्ट्रवादीचे राहुल निंबाळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मनोज शेडगे निवडणूक रिंगणात आहेत.