Saturday, September 12, 2026
Homeसाताराफलटण-कोरेगाव मतदारसंघात बौद्ध आमदार मिळण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग

फलटण-कोरेगाव मतदारसंघात बौद्ध आमदार मिळण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग

फलटणः फलटण तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या बौद्ध महामेळाव्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरणात नव्या घडामोडींना चालना मिळाली आहे. या महामेळाव्यानंतर, फलटण-कोरेगाव मतदारसंघात बौद्ध आमदार निवडण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. बौद्ध समाजातील सर्व नेते एकत्र येऊन, आपल्या समाजाला विधानसभेत प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी कटिबद्ध झाल्याचे दिसत आहे.

हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या या महामेळाव्यात, बौद्ध समाजाला आपला आमदार मिळालाच पाहिजे, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला. गेल्या पंधरा वर्षांपासून बौद्ध समाजाला अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नाही, अशी भावना व्यक्त होत असून, यावेळी मतदारसंघात बदल घडवण्यासाठी बौद्ध आमदार निवडून आणण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

या महामेळाव्याला बौद्ध समाजाबरोबरच इतर धर्मियांचा आणि राजकीय नेत्यांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे दिसत आहे. यामुळे, फलटण-कोरेगाव मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे, आणि आगामी निवडणुकीत बौद्ध आमदार निवडून येण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments