बारामतीच्या धर्तीवर फलटणला ‘सिटी हॉस्पिटल’ची भेट – गरीब रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेवा सुरू

0
72
बारामतीच्या धर्तीवर फलटणला ‘सिटी हॉस्पिटल’ची भेट – गरीब रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेवा सुरू

फलटण :- फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात नगरपरिषदेच्या माध्यमातून ‘सिटी हॉस्पिटल’ सुरु करण्याची गती वाढली असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे, असा विश्वास खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.

उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेल्या नवीन डायलिसिस मशीनच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. या मशीनमुळे गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घेण्याची वेळ टळणार असून आता मोफत डायलिसिसची सुविधा मिळणार आहे, असे आमदार सचिन पाटील यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला आमदार सचिन पाटील, माणिकराव सोनवलकर, डॉ. अंशुमन धुमाळ, डॉ. प्रविण आगवणे, डॉ. जे.टी. पोळ, जयकुमार शिंदे, बापूराव शिंदे, तुकाराम शिंदे, सचिन रणवरे, संदिप चोरमले, नगरसेवक अजय माळवे, सुधीर अहिवळे, सचिन अहिवळे, झाकिरभाई मणेर, राहुल शहा, राजाभाऊ देशमाने यांची उपस्थिती होती.