फलटण_निवडणूक2025 : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर!

0
48
फलटण_निवडणूक2025 : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर!

फलटण – येत्या २०२५ मध्ये होणाऱ्या फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण होणार आहे. नगरपरिषदेच्या सदस्यपदांसाठी आरक्षणाची सोडत बुधवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनच्या पाठीमागील इमारतीत (बीएसएनएल ऑफिसजवळ) आयोजित करण्यात आला असून, याबाबतची माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार ही आरक्षण सोडत होणार आहे. या सोडतीनंतर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीचे आराखडे स्पष्ट होणार असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे.

मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहरातील सर्व नागरिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच पत्रकार यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.