फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार

0
67
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीला सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार

फलटण  : शेतकऱ्यांच्या केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने पुन्हा एकदा राज्यस्तरीय यशाची नोंद केली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित पुणे तर्फे दिला जाणारा मा. वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार सन 2025 या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड झाली आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार समितीला सलग तिसऱ्यांदा मिळाल्याने राज्यस्तरीय “हॅटट्रिक” पूर्ण झाली आहे.

समितीच्या वतीने संचालिका सौ. जयश्री गणपत सस्ते यांनी उपाध्यक्ष भगवानराव होळकर, संचालक, सचिव व स्टाफ यांच्या उपस्थितीत हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.

यापूर्वी समितीला मिळालेले पुरस्कारांमध्ये –
1️⃣ वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार
2️⃣ महाराष्ट्र शासनाचे स्टेट रँकिंग (स्मार्ट) – जिल्ह्यात सलग तीन वर्ष प्रथम क्रमांक, कोल्हापूर विभागात प्रथम व द्वितीय क्रमांक
3️⃣ नवराष्ट्र-नवभारत टाइम्सचा बेस्ट APMC पुरस्कार

चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या कल्पक दृष्टीकोनाखाली समितीने शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्यांवर तोडगा काढणे, शेतमालाला चांगला दर मिळवून देणे, ई-नाम कामकाज, वृक्षारोपण, शासकीय योजनांची अंमलबजावणी अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे हा सन्मान प्राप्त झाला आहे.

पुरस्कारप्राप्तीनिमित्त मंत्री जयकुमार रावल, विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह शेतकरी व मार्केट फंक्शनरीज यांनी समितीचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच सहकार व पणन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही शुभेच्छा दिल्या.

समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, “हा पुरस्कार म्हणजे शेतकरी, अडते, खरेदीदार, हमाल, मापाडी, संचालक मंडळ, सचिव शंकरराव सोनवलकर व संपूर्ण स्टाफ यांच्या टिमवर्कचे फळ आहे. या सर्व घटकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.”