
संसदेत घुसखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या चौकशीत नवीन खुलासा करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, लोकसभेत उडी मारून रंगीत धूर सोडण्याच्या योजनेवर सहमती मिळवण्यापूर्वी आत्मदहन करणे आणि पाम्पलेट वाटण्याबाबतच्या पर्यायांवरही विचार केला होता. दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी शनिवार ही माहिती दिली. प्रकरणाचा तपास करत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आता भाजप खासदार प्रताप सिम्हा यांची साक्षही नोंदवणार आहे. त्यांच्या शिफारसीवरून घुसखोरांना संसदेत प्रवेश मिळाला होता.








