
यापूर्वी विशेष भागात श्रिया आणि सचिन पिळगांवकर या बाप-लेकीच्या जोडीने हजेरी लावली होती. या आठवड्यातील विशेष भागात परेश रावल आणि विजय केंकरे हे एकत्र हॉट सीटवर बसणार आहेत. परेश रावल हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचे आवडते कलाकार. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. बाबूराव गणपतराव आपटे ही व्यक्तिरेखा मराठी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. मराठीबरोबर त्यांचे सुरुवातीपासूनच अनोखे नाते जोडले गेले आहे. मराठी भाषेबद्दल असलेले त्यांचे प्रेम व अनोखे नाते आपल्याला कोण होणार करोडपतीच्या या विशेष भागात पाहायला मिळेल. मराठी वहिनींच्या इतिहासात परेश रावल पहिल्यांदा एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. त्यांची आजवर गाजलेल्या मराठी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडल्या.







