
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी जितेंद्र वंजारा यांच्या घरी पार्सल पोहचून देणारा ऑटोरिक्शाचालक आणि हे पार्सल तयार करणारा जयंती वंजारा या दोघांना अटक केली आहे. जयंती वंजाराला त्याची पत्नी आणि जितेंद्र वंजारा यांच्यादरम्यान अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यासंशयातून त्याने जितेंद्र वंजाराला संपवण्याची योजना आखली होती. त्यानुसार त्याने पार्सल बॉम्ब तयार करण्याची कृती शिकून घेऊन शेजारच्या राजस्थानमध्ये जाऊन साहित्य आणले होते, असं पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीवरून पोलिसांनी पुरावे जमा केले आहे. स्फोट झाला तेव्हा जितेंद्र वंजारा यांची पत्नी घरात नव्हती.