
Pamela Chopra Passes Away : कभी कभी, सिलसिला, काला पत्थर, चाँदनी अशा अनेक सुपरहिट चित्रपटांतील गाण्यांना आवाज देणाऱ्या प्रसिद्ध पार्श्वगायिका व निर्माते आदित्य चोप्रा यांच्या आई पामेला चोप्रा यांचं आज निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी पामेला यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात निर्माता आदित्य चोप्रा व अभिनेता उदय चोप्रा ही दोन मुलं व सून अभिनेत्री राणी मुखर्जी असा परिवार आहे.






