Palghar: मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेले, बोट उलटली अन् होत्याचं नव्हतं झालं, एकाचा दुर्दैवी मृत्यू

0
20
Palghar: मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेले, बोट उलटली अन् होत्याचं नव्हतं झालं, एकाचा दुर्दैवी मृत्यू


मिळालेल्या माहितीनुसार, भूपेंद्र अंभिरे असे समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. भूपेंद्र अंभिरे हा त्याचा सहकारी संजय पाटील यांच्यासोबत डहाणूच्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले. मात्र, बोट पलटल्याने दोघेही पाण्यात पडले. भूपेंद्र अंभिर हा पाण्यात बुडाला. संजय पाटील हा तरुण पोहत कसाबसा समुद्रकिनाऱ्यावर आल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेची माहिती स्थानिक पोलीस प्रशासन आणि तटरक्षक दलाला देण्यात आली. यानंतर बेपत्ता भूपेंद्र अंभिरेला शोधण्यासाठी शोध मोहिम हाती घेण्यात आली. मात्र, त्याचा कुठेही शोध लागला नाही. काही वेळानंतर भुपेंद्रचा मृतदेह समुद्रकिनारी आढळून आला.



Source link