
बांधावर गुरे चारण्याच्या क्षुल्लक मुद्दावरून पालघर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा हकनाक जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. किरकोळ मुद्दाचे पर्यवसान हाणामारीत होऊन एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेला दोन शेतकऱ्यांदरम्यान असलेल्या जुन्या वादाची किनार असल्याचे परिसरात बोलले जात आहे.






