
एसटी बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात पालघर जिल्ह्यातील मनोर-विक्रमगड मार्गावर शनिवारी दुपारच्या सुमारास झाला. या अपघातात बसमधील जवळपास २० प्रवासी जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




