
आदिपुरुष
‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर तामिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज झाला आहे. प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खानचा हा चित्रपट आता जवळपास गेल्या आठवडाभरापासून टॉप ५मध्ये राहिला आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपटाला बर्याच टिकेचा सामना करावा लागला होता. परंतु, ओटीटीवर या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळत आहेत.







