Opposition MP Suspended | लोकसभेनंतर आता राज्यसभेतील 45 विरोधी खासदार संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित ; जयराम रमेश आणि के सी वेणुगोपाल यांच्या नावांचाही समावेश | Navarashtra (नवराष्ट्र)

0
13
Opposition MP Suspended | लोकसभेनंतर आता राज्यसभेतील 45 विरोधी खासदार संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित ; जयराम रमेश आणि के सी वेणुगोपाल यांच्या नावांचाही समावेश | Navarashtra (नवराष्ट्र)

jagdeep dhankhan

हिवाळी अधिवेशनात 92 खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले आहे. यापैकी लोकसभेतील 33 आणि राज्यसभेतील 45 विरोधी खासदारांना सोमवारी (18 डिसेंबर) निलंबित करण्यात आले आहे.

लोकसभेनंतर राज्यसभेतील 45 विरोधी खासदारांना सोमवारी (18 डिसेंबर) निलंबित करण्यात आले. निलंबित खासदारांमध्ये प्रमोद तिवारी, जयराम रमेश, केसी वेणुगोपाल, रामनाथ ठाकूर, मनोज झा, रामगोपाल यादव, जावेद अली खान, महुआ माझी आणि शंतनू सेन यांचा समावेश आहे.

निलंबित खासदारांच्या नावांमध्ये समीरुल इस्लाम, फैयाज अहमद, अजित कुमार, नानारायण भाई जेठवा, रणजित रंजन, रणदीप सुरजेवाला, रजनी पाटील, एम संगम, अमी याज्ञिक, फुलो देवी नेताम आणि मौसम नूर. या 45 खासदारांपैकी 34 खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी तर विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत 11 खासदारांना निलंबित करण्यात आले होते.

Source link