
Operation Sindoor : भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी अतिशय नियोजित आणि केंद्रीत असे हल्ले पाकिस्तानी तळांवर करण्यात आले. या हल्ल्यानंतर जगभरात भारतीय लष्करातील वायुदलाच्या ताकदीविषयीसुद्धा बरंच लिहिलं आणि बोललं गेलं. इतकं की, भारतातील Air Defence System ची संपूर्ण यादीच समोर आली आणि शत्रूचा थरकाप उडाला. (India Pakistan War)
किती बलशाली आहे भारताचं वायुदल?
भारतीय वायुदल (Indian Airforce) मध्ये एकूण 1750 विमानांचा समावेश आहे, ज्यामध्ये जवळपास 900 लढाऊ विमानांचा समावेश आहे. हल्लीच भारतानं एक मोठा अब्जावधींचा करार करत 26 राफेल विमानांचीसुद्धा खरेदी केली आणि ही ताकद आणखी वाढली. भारतीय वायुदलानं Akash-NG नावाचं एक देशी बनावटीचं क्षेपणास्त्र तयार करत त्या मदतीनं 70 ते 80 किमीपर्यंतचा मारा करण्याची क्षमता गाठली. सध्या भारतातून हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आणि त्यांच्या तंत्रज्ञानावर काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
भारतातील लाँग रेंज डिफेन्स सिस्टीम
दूरवरच्या अंतरावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये बॅलिस्टीक मिसाईलचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं. याशिवाय भारतातील पृथ्वी एअर डिफेन्स मिसाईलही या यादीत येतं. एक्सो अॅटमॉसफेरिक इंटरसेप्टर पद्धतीचं हे मिसाईल 300 ते 2000 किमी रेंजमध्ये मारा करतं. साधारण 600 किमीवर असणारे 200 लक्ष्यसुद्धा हे मिसाईल हेरतं. 2006 मध्ये त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. अॅडवान्स एअर डिफेन्स सिस्टीमसुद्धा याच यादीतील एक भाग. ज्याची भेदक क्षमता 150 ते 200 किमी इतकी आहे.
मध्यम आणि कमी अंतरावर मारा करणारी क्षेपणास्त्र
आकाश एअर डिफेन्स सिस्टीमचा या यादीत समावेश होत असून, या क्षेपणास्त्रानं साधारण 45 किमी अंतरापर्यंत भेदक मारा केला जातो. तर, इस्रायली बनावटीच्या स्पाडर या क्षेपणास्त्राचासुद्धा यात समावेश आहे. Quick-reaction low-level defence system अशी त्याची ओळख. 2K12 Kub (Kvadrat) हे असंच एक रशियन बनावटीचं क्षेपणास्त्र असून 24 किमी अंतरावरील लक्ष्यभेद ते अचूकपणे करतं. तर, Barak 8 (LR-SAM/MR-SAM) हे क्षेपणास्त्र 0.5–100 किमीवरील लक्ष्यभेद करत असून, सैन्यदल, वायूदल आणि नौदलाकडे ही यंत्रणा आहे. QRSAM (Quick Reaction SAM) या प्रणालीच्या माध्यमातून 3.30 किमी अंतरावरील लक्ष्य नष्ट करता येतं. BEML-Tatra 8WD trucks वर ही क्षेपणास्त्र तैनात करता येतात.
(VSHORAD) अतिशय कमी अंतरावरील लक्ष्यभेद
9K35 Strela-10, साधारण रणगाड्यासम दिसणाऱ्या या स्ट्रेलातून 5 किमीवरील शत्रूचा नायनाट करता येतो. तर, 2K22 Tunguska च्या मदतीनं 65 km/h इतक्या वेगानं शत्रूवर चाल करता येते. ZSU-23-4 Shilka मध्ये 4 × 23 mm च्या तोफवजा बंदुका तैनात असून, ही एक रडारवर आधारित शस्त्रप्रणाली आहे. अँटी एअरक्राफ्ट आणि अँटी मटेरिअल श्रेणीतील 14.5 मिमीची KPV Heavy Machine Gun सुद्धा देशाच्या शस्त्रसाठ्यात महत्त्वाची भर पडते.
पर्यायी संरक्षण प्रणाली
S-125 Pechora ही रशियन बनावटीची प्रणाली असून त्या माध्यमातून 30 किमीपर्यंत मारा करता येतो. 9K33 Osa-AK चासुद्धा या यादीत समावेश आहे. 15 ते 18 किमीवरील लक्ष्यभेद करण्यात ही प्रणाली समर्थ असून,