फलटणमध्ये अॅव्होकॅडो शेतीवर एकदिवसीय चर्चासत्र

0
6
फलटणमध्ये अॅव्होकॅडो शेतीवर एकदिवसीय चर्चासत्र

फलटण / प्रतिनिधी. फलटण परिसरातील शेतकऱ्यांना शेतीत नवे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटी चलित श्रीमंत शिवाजीराजे ज्ञानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय अॅव्होकॅडो पिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर होते. त्यांनी सांगितले की, “फलटण तालुक्याचे हवामान अॅव्होकॅडो लागवडीसाठी पोषक आहे. शेतकऱ्यांनी या फळाला उत्पन्नाचा उत्तम पर्याय म्हणून स्वीकारावे.”

गणेश बाबर (श्लोकाज अॅग्रो प्रा. लि., उडतारे) यांनी हवामान, मातीची निवड, लागवड तंत्रज्ञान, वाणांची निवड, खत व सिंचन व्यवस्थापन, छाटणी पद्धती तसेच काढणीनंतरचे व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या वेळी सौ. श्रीमंत शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, रणजित निंबाळकर, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, विश्वासदादा गावडे, धनंजय पवार, शिरीषशेठ दोशी यांसह मान्यवरांची उपस्थिती होती.

संचालन सृष्टी झाडोकर व प्राजक्ता जाधव यांनी केले तर आभार डॉ. जी. बी. अडसूळ यांनी मानले.