
‘ओएमजी २’च्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात चांगली झाली आहे. तर, १५ ऑगस्टच्या सुट्टीचा फायदाही या चित्रपटाला मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाची कमाई चांगली झाली आहे. आता हा चित्रपट १०० कोटींच्या ओपनिंगकडे वेगाने वाटचाल करत आहे. प्रौढ शिक्षणावर आधारित ‘ओएमजी २’चे पहिल्या आठवड्यातील कलेक्शन ८५.०५ कोटींवर थांबले आहे. आता दुसऱ्या आठवड्याच्या ओपनिंगमध्ये या चित्रपटाने ९० कोटींचा आकडा पार केला आहे.








