
‘ओएमजी २’मध्ये अक्षय कुमार सोबत यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यावेळी हा चित्रपट शिक्षण व्यवस्थेवर आधारित असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती विपुल शाह, राजेश शाह, अश्विन वर्दे आणि अक्षय कुमार यांनी संयुक्तपणे केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अमित राय आहेत. या आधी ‘ओएमजी’ अर्थात ‘ओह माय गॉड’ २०१२ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार आणि परेश रावल मुख्य भूमिकेत झळकले होते.







