
फलटण :- फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकत व सूचना दाखल करताना नागरिकांनी आपल्या अर्जासोबत स्थळ पाहणीसाठी सक्षम रहिवासी पुरावा जोडणं अनिवार्य आहे, असं आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केलं आहे.
प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून हरकती दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असून, नगरपरिषदेचे प्रशासन त्या हरकतींवर जागेवर जाऊन पाहणी करणार आहे. मात्र, केवळ पुराव्यासह आलेल्या हरकतीच विचारात घेतल्या जातील व त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असंही जाधव यांनी स्पष्ट केलं.
हरकत दाखल करण्याची अंतिम मुदत – सोमवार, १३ ऑक्टोबर
नागरिकांनी ही अंतिम तारीख लक्षात ठेवून योग्य त्या पुराव्यांसह आपली हरकत वेळेत दाखल करावी, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.







