
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रात लवकरच महानगरपालिकांचे बिगुल वाजेल. सत्ता – समीकरणाची गणिते जुळविण्याची लगबग सुरू होईल. याचं साऱ्या निवडणुकीच्या धामधुमीत काही नवीन चेहरे देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
याचं पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवड मध्ये देखील नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील जनतेची अनेक वर्ष सामाजिक – राजकीय सेवा केलेले पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांचे पुतणे गणेश विलास साने यांनी देखील आपण यंदाची पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक ११ मधून लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.
लहानपणापासून आपले काका दत्ता साने यांच्या लोकसेवेच्या तालमीत समाजकारणाचे धडे गिरवत असताना, आपणही काकांसारखे जनतेच्या सेवेसाठी काम करण्याचा मानस त्यांनी उराशी बाळगला आणि आज प्रत्यक्षात ते निवडणुकीच्या रिंगणातून जनतेच्या सेवेसाठी पुढे येताना दिसत आहे.
दत्ता काका साने यांच्या जडणघडणीतून सज्ज झालेले गणेश विलास साने नक्कीच येणाऱ्या काळात आपल्या कामातून प्रभाग क्रमांक ११ मधील जनतेच्या मनावर ठसा उमटवतील अशी चर्चा सध्या जनतेमधून होताना दिसत आहे.






