New Delhi School | दिल्लीतील प्रदूषण वाढलं, पाचवीपर्यंत खासगी आणि सरकारी शाळांना सुट्टी! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
12
New Delhi School | दिल्लीतील प्रदूषण वाढलं, पाचवीपर्यंत खासगी आणि सरकारी शाळांना सुट्टी! | Navarashtra (नवराष्ट्र)


दिल्लीतील प्रदूषण वाढलं, पाचवीपर्यंत खासगी आणि सरकारी शाळांना सुट्टी!

आतिशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर माहिती दिली की , “अत्यंत उच्च प्रदूषण पातळीमुळे, दिल्लीतील प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील.

नवी दिल्ली: नवी दिल्लीत (New Delhi School) गेल्या दोन आठवड्यांपासून वायू प्रदूषणामुळे (Pollution) दिल्लीतील लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आजही हवा गुणवत्ता निर्देशांक अत्यंत खराब श्रेणीत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये दिल्ली सरकारने आता सर्व खासगी आणि सरकारी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर प्राथमिक शाळांमधील मुलांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू राहतील, तर उच्च वर्गातील मुलांसाठी संबंधित शाळा आपापल्या परीने आवश्यक निर्णय घेऊ शकतील.

हे सुद्धा वाचा

या संदर्भात दिल्लीचे शिक्षण मंत्री आतिशी यांनी आज म्हणजेच रविवारी घोषणा केली की, राष्ट्रीय राजधानीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्राथमिक शाळा 10 नोव्हेंबरपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्याचा पर्याय देण्यात आला आहे.






Source link