
कोण आहे हा नेव्हिल सिंघम?
नेव्हिल सिंघम हा भारतात चीनचा प्रचार-प्रसार करण्यासाठी काम करतो. भारतातील ‘न्यूजक्लिक’ हे पोर्टल सिंघमकडून आर्थिक मदत केल्या जाणाऱ्या नेटवर्कचा भाग आहे, असा दावा अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तपत्रात सर्वप्रथम केला होता. या लेखानुसार, सिंघम हा अमेरिकन अब्जाधीश आहे. तो ‘थॉटवर्क्स’ या आयटी कन्सल्टंट कंपनीचा सल्लागार आहे. ‘लिंक्डइन’वरील प्रोफाइलनुसार, १९९३ ते २०१७ या कालावधीत तो या कंपनीत सक्रिय होता. नंतर त्यानं ही कंपनी विकून टाकली.







