
अभिनेता नील नितीन मुकेश याचा जन्म १५ जानेवारी १९८२ रोजी महाराष्ट्रात झाला. नील नितीन मुकेश या त्याच्या नावामागे देखील एक रंजक कथा आहे. नीलच्या घरी संगीत पार्श्वभूमी आहे. मात्र, नीलला संगीतासोबतच अभिनयाची देखील आवड निर्माण झाली होती. अभिनेत्याचे पूर्ण नाव नील नितीन मुकेश चंद माथूर असे आहे. नीलला हे नाव प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी दिले होते. लता मंगेश या त्यावेळी नील आर्मस्ट्राँगमुळे खूप प्रभावित झाल्या होत्या. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा अभिनेत्याला पाहिले, तेव्हा त्या म्हणाल्या की, याचं नाव नील ठेवा. आणि तेव्हापासून त्याला नील हे नाव मिळाले. नील या आपल्या नावासोबतच आपल्या वडिलांचं आणि आजोबांचं नाव देखील लावतो.








