
मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या मोजक्या अभिनेत्रींमध्ये नेहा पेंडसे या गुणी अभिनेत्रीचा समावेश होतो. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून नेहा पेंडसे घराघरात पोहोचली. नेहा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. परंतु नेहाची अशी एक गोष्ट आहे, जी तिच्या चाहत्यांना अजूनही माहित नाही आणि ती गोष्ट म्हणजे नेहा सहा गोंडस मुलांची आई आहे.






