
फलटणःमुंबई येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली माढा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक आयोजित केली आहे.
यामध्ये आढावा घेत असताना माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तीन विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार असल्याने माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनाच मिळावी अशी आग्रही मागणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आज मुंबई येथे दाखल झालेले आहेत.
आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणजेच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांची माढा लोकसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी ही सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनाच मिळावी; यासाठी आज फलटण तालुक्यासह माढा लोकसभा मतदारसंघांमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची टीम मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात दाखल झाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार नक्की कोणती भूमिका जाहीर करतात? च्याकडे सातारा व सोलापूर जिल्ह्याचे लक्ष राहिले आहे. ला








