Nawazuddin Siddiqui : मला बदनाम करण्यासाठी आलिया मुलांचा वापर करतेय; नवाजुद्दीनचा पत्नीवर पलटवार!

0
8
Nawazuddin Siddiqui : मला बदनाम करण्यासाठी आलिया मुलांचा वापर करतेय; नवाजुद्दीनचा पत्नीवर पलटवार!


पत्नीचे आरोप फेटाळून लावताना नवाज म्हणाला की, ‘मी मुलांच्या सोयीसाठी तिला अनेक लक्झरी कार दिल्या होत्या. मात्र, त्या विकून तिने पैशांची उधळपट्टी केली. मी आमच्या मुलांसाठी वर्सोवामध्ये एक सीफेसिंग घर देखील घेतले होते. मात्र, मुलं लाहान असल्याने ते घर आलियाच्या नावावर आहे. यानंतर मी मुलांना दुबईमध्ये एक लक्झरी घर घेऊन दिले. या घरात आलिया देखील आरामात राहत आहे. तिला केवळ पैसा हवा आहे, म्हणून ती असे आरोप करत आहे. माझी मुलं मुंबईत सुट्टीसाठी येतात, तेव्हा ती त्यांच्या आजीसोबतच राहतात. मुलांना कधीच घराबाहेर काढलं गेलं नाही. मी त्यावेळी घरात नव्हतो, तेव्हाच हा व्हिडीओ बनवला गेला. मला ब्लॅकमेल करण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी आलिया मुलांना या प्रकरणात ओढत आहे.’



Source link