
नवाज सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. या प्रमोशनच्या वेळी त्याने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याला २८ वर्षींनी लहान अभिनेत्रीला किस करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्याने, ‘आता तरुण अभिनेते हे नल्ले झाले आहेत आणि ते रोमँन्स करु शकत नाही तर आम्हीच पुढे आले आहोत. त्यामुळेच मोठे कलाकारच रोमँन्स करताना दिसत आहेत. आजकालचे अभिनेते कुठे रोमॅन्स दाखवतात. त्यांचा रोमॅन्स व्हॉट्सअपवर येऊन थांबला आहे. रोमॅन्स तर शाहरुख आणि सलमानने करावा’ असे उत्तर देत सर्वांचे लक्ष वेधले.







