
पोलिसांकडून परवानगी मिळाल्याने नवरात्रीतील शेवटच्या तीन दिवसात म्हणजे २१, २२ व २३ ऑक्टोबरला रात्री १२ वाजेपर्यंत लाऊड स्पीकर लावण्याची परवानगी आहे. यामुळे तरुणाईमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गरब्यास रात्री उशिरापर्यंत परवानगी देण्याची मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती. नवरात्रीच्या काळात दोन ऐवजी तीन दिवस रात्री १२ पर्यंत गरबा-दांडिया खेळायला परवानगी द्यावी,अशी मागणी प्रवीण दरेकरांनी केली होती. यावर सरकारने आता १२ वाजेपर्यंत परवानगी दिली आहे.






