
आई होण्याच्या आशेने आता आनंदी नवऱ्याची आज्ञा मोडून सासूच्या श्रद्धेचा मान राखणार आहे. कठीण वाटणारं हे निर्जला व्रत आनंदी पूर्ण करणार आहे. तर, हे व्रत पूर्ण करताना तिच्यावर राघवची नजर पडणार आहे आणि तो तिच्यावर रागवणार आहे. आनंदीचं गर्भाशय अतिशय कमजोर असल्याने ती कधीच बाळाला जन्म देऊ शकणार नाही, अर्थात ती कधीच आई होऊ शकणार नाही, असे डॉक्टरांनी तिला सांगितलं आहे. हे ऐकताच आनंदीच्या आनंदी आयुष्यात अचानक दुःखाचं वावटळ आलं आहे. आपण कधीच आई होऊ शकणार नाही, या विचाराने आनंदी पूर्णपणे कोलमडून गेली आहे. बाळाची स्वप्न रंगवणाऱ्या आनंदीच्या आयुष्यात अचानक एक मोठं वादळ आलं आहे. यामुळे ती पूर्णपणे खचून गेली आहे.








