National Shooter Tara Shehadev, | राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव लैंगिक छळ प्रकरणी न्यायालयाचा निर्णय, रकीबुलला जन्मठेपेची शिक्षा! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
23
National Shooter Tara Shehadev, | राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव लैंगिक छळ प्रकरणी न्यायालयाचा निर्णय, रकीबुलला जन्मठेपेची शिक्षा! | Navarashtra (नवराष्ट्र)


राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव लैंगिक छळ प्रकरणी न्यायालयाचा निर्णय, रकीबुलला जन्मठेपेची शिक्षा!

राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव हिच्या लैंगिक छळ प्रकरणी सीबीआय न्यायालयाने तिचा नवरा रकीबुल हसनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तारा सहदेव आणि रकीबुल यांचा विवाह जुलै 2014 मध्ये झाला होता. लग्नानंतर रकीबुल ताराला मारहाण करू लागला आणि तिच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकत होता.

राष्ट्रीय नेमबाज तारा शाहदेवचा  (National Shooter Tara Shehadev)लैंगिक छळ आणि जबरदस्तीने धर्मांतर केल्याप्रकरणी दोषी रणजीत कोहलीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने झारखंड उच्च न्यायालयाचे माजी रजिस्ट्रार (नियंत्रण) मुश्ताक अहमद यांना 15 वर्षांची आणि रणजीतची आई कौशल राणी यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

हे सुद्धा वाचा

30 सप्टेंबर आढळला दोषी

30 सप्टेंबर रोजी सीबीआयचे विशेष न्यायाधीश पीके शर्मा यांच्या न्यायालयाने वरील आरोपात तिन्ही आरोपींना दोषी ठरवले आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत घेऊन बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृह होतवार येथे पाठवले. तर तिच्यावर वारंवार शारीरीक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी रणजितसिंग कोहलीला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तर मुश्ताक अहमद आणि कौशल राणी यांना एका महिलेसह इतरांवर वारंवार अत्याचार करण्याचा कट रचल्याच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावण्यात आली आहे.






Source link