Narendra Modi | नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला घेणार पंतप्रधानपदाची शपथ? NDA तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
Narendra Modi | नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला घेणार पंतप्रधानपदाची शपथ? NDA तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार | Navarashtra (नवराष्ट्र)


नरेंद्र मोदी ‘या’ तारखेला घेणार पंतप्रधानपदाची शपथ? NDA तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार

PM Modi Breaking : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एनडीएने आघाडी सरकार स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक निकालात भाजपने 240 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांना उत्सुकता लागली ती म्हणजे, पुन्हा कोणाचे सरकार स्थापन होणार?

लोकसभा निवडणुकांचे काल निकाल समोर आले. या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. याचदरम्यान आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली. एनडीए तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहे. यासाठी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. 8 जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासंदर्भातील नव्या मंत्रिमंडळातील चेहऱ्यांबाबत मित्रपक्षांशी चर्चा आणि बैठकींचे सत्र सुरु आहेत. या दोन-तीन दिवसांत नावे निश्चित होण्याची शक्यता आहे.

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील. यापूर्वी हा विक्रम जवाहरलाल नेहरूंच्या नावावर होता. मोदी त्यांच्या विक्रमाची बरोबरी करतील.






Source link