
समाजसेवक डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना पुणे स्थित सीबीआय कोर्टाने आज सश्रम जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कोर्टाने आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनळेकर यांना निर्दोष ठरवले आहे. दरम्यान, दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे पुत्र डॉ. हमीद दाभोलकर आणि मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. मात्र न्यायालयाने ज्या आरोपींना निर्दोष सोडलं आहे त्याविरोधात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं म्हटलं आहे.







