
मंगळवारी रात्री पटेल नामक व्यापाऱ्याचे दोन कर्मचारी हे रात्री ८ च्या दरम्यान, वसूली करून दुचाकीवरुन जात होते. त्यांच्याकडे तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांची रक्कम होती. दरम्यान, हे दोघे व्यापाऱ्याच्या भुतडा चेंबर्स येथील कार्यालयाकडे जात होते. यावेळी बारदाना गल्लीमध्ये आधीच उभ्या असलेल्या दोन लूटारुंनी त्यांना रस्त्यात अडवले. यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत, त्यांच्या कडील रकमेची मागणी त्यांनी केली.






