
Nagpur Blast News: नागपुरच्या बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत आज भीषण स्फोट झाला. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर, ३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस चौकशी करीत आहेत.




