Mushrif Vs Awhad : “…त्यावेळी जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या पाया पडले”; मुश्रीफांचा बीडमधील सभेत गौप्यस्फोट

0
19
Mushrif Vs Awhad : “…त्यावेळी जितेंद्र आव्हाड फडणवीसांच्या पाया पडले”; मुश्रीफांचा बीडमधील सभेत गौप्यस्फोट


काहींच्या रक्तातच गद्दारी असते असा घणाघात आव्हाडांनी नाव न घेता अजित पवार गटावर केला होता. जे साप बिळात होते, ते बाहेर पडले आहेत. या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. कोल्हापुरात पायतान प्रसिद्घ आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राने करावा, असा टोलाही आव्हाडांनी लगावला होता. कोल्हापूरच्या सगळ्या उस्तादांना भेटायला एक वस्ताद आलाय, त्या वस्तादाचं नाव शरदचंद्र पवार साहेब, असे म्हणतआव्हाडांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. यानंतर हसन मुश्रीफ यांनी आव्हाडांवर पलटवार करताना कोल्हापूरच्या कपाशीचं पायताना बसल्यावर त्याला कळेल, असे म्हटले. त्यावर आव्हाड यांनी ट्विट केलं होतं की, कोल्हापुरातील गर्दी बघून तुमचे संतुलन बिघडले असेल, असा टोला लगावला होता.



Source link