
राजाराम गजानन जायभाये (वय, ३०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, संतोष थोरवे (वय, ३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राजाराम हा विवाहित असून त्याचे संतोष थोरवे यांच्या घरी जाणे- येणे होते. यादरम्यान, राजारामच्या पत्नीसोबत संतोषची जवळीक वाढली. मात्र, अनैतिक संबधात राजाराम अडसर ठरत होता. यामुळे संतोषने त्याचा कायमचा काटा काढण्याचा ठरवले.






