मुंबईत गेल्या दोन दिवसांनपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाचा फटका लोकल आणि रेल्वेला बसला आहे. दक्षिण मुंबईतील सायन, हिंदमाता, परळ या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. तर उपनगरात असल्फा, साकीनाका, जेबी नगर, विक्रोळी, घाटकोपर, चकाला, अंधेरी येथे देखील पाणी साचाले आहे. पावसामुळे वाहतुकीचा वेग देखील मंदावला आहे. यामुळे मुंबईत सकाळपासून आखी रस्त्यांवर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. मुंबई ठाण्यात पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. ठाण्यात देखील आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.





