
पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग उद्या १ सप्टेंबर दोन तासांसाठी बंद ठेवला जाणार आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी थोडी गैरसोय होणार आहे. महामार्ग दुरुस्ती तसेच सीसीटीव्ही साठी ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.






