
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काशिमीरा येथे मेलेल्या कोंबड्यांना विक्रीसाठी नेणाऱ्या व्यक्तीला पकडलं. त्यावेळी आरोपीने कोंबड्यांना नाल्यात फेकण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. परंतु मनसैनिकांनी कडक भाषेत जाब विचारला असता आरोपीने मुंबईतील वांद्रे परिसरातील हॉटेलमध्ये ३० रुपयांत मेलेल्या कोंबड्यांची विक्री करत असल्याची कबुली दिली. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीची माहिती घेत त्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळं मेलेल्या कोंबड्यांची विक्री करणारं एक मोठं रॅकेट मुंबईत कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.





