
कचरा फेकणाऱ्या या व्यक्तीला मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेनं शोधून काढलं. त्याला थेट १० हजार रुपायांचा दंड ठोठवला. समुद्रात कचरा फेकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर अनेकांनी त्या घटनेवरून टीका केली जात होते. या व्हिडिओचा दाखला घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला होता. हा व्यक्ती ६२ वर्षीय असून त्याचे नाव याकूब दुधवाला असल्याचे सांगितले जात आहे.






