
Mumbai malad murder news : मुंबईत संपत्ती विकण्याच्या वादातून एकाने आपल्या पत्नीच्या डोक्यात फ्लॉवरपॉट मारून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने भावावरही प्राणघातक हल्ला केला असून यात भाऊ हा गंभीर जखमी झळा आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर आरोपी हा फरार झाला आहे. या प्रकरणी बांगनूरनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.






