Mumbai Marathon : मुंबईची प्रदूषित हवा बेतली मॅरेथॉनपटूंच्या जिवावर! १५ स्पर्धक आयसीयूमध्ये दाखल, दोघे व्हेंटिलेटरवर

0
4
Mumbai Marathon : मुंबईची प्रदूषित हवा बेतली मॅरेथॉनपटूंच्या जिवावर! १५ स्पर्धक आयसीयूमध्ये दाखल, दोघे व्हेंटिलेटरवर

Mumbai Marathon News : मुंबईत रविवारी टाटा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये तब्बल ६२ हजार स्पर्धकांनी भाग घेतला. मात्र, यातील बऱ्याच स्पर्धकांना खराब हवामानामुळे त्रास झाला. मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब असल्याने त्यांना श्वसनाचा त्रास झाला. काही धावपटू चक्कर येऊन पडले. यातील काही जणांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. तर दोघे जण व्हेंटीलेटरवर आहेत. काल मुंबईत सीएसएमटीजवळ हवेच्या गुणवत्ता निर्देशांक हा १५० एक्युआय एवढा होता.

Source link