Mumbai Local Train : मुंबईकर महिलांसाठी आनंदाची बातमी, लोकल रेल्वेत मिळणार ही सुविधा

0
19
Mumbai Local Train : मुंबईकर महिलांसाठी आनंदाची बातमी, लोकल रेल्वेत मिळणार ही सुविधा


मुंबईतील सेन्ट्रल रेल्वे मार्गावरील लोकमान्य टिळक टर्मिनस, कांजूरमार्ग, मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर आणि ठाणे येथील रेल्वे स्थानकात सौंदर्य प्रसाधनांची सोय करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह, सौंदर्य साहित्यांची विक्री, कॉफीशॉप, शिशुंच्या स्तनपानासह डायपर बदलण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय फ्री वायफाय, सीसीटीव्ही आणि महिलांना रेल्वेत सुरेक्षसाठी एक अॅप देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकात २०० चौरस फुटांची जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत रेल्वे स्थानकांमध्ये सौंदर्य प्रसाधनगृहांची उभारणी करणं कंत्राटदारांना अनिवार्य करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.



Source link