
Mumbai Local Mega Block : दिवाळीसह अन्य सण जवळ आल्याने नोकरदार, चाकरमान्यांसह अनेकांनी घरी जाण्याचा प्लॅन आखला आहे. परंतु आता सणासुदीला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण आता मुंबईतील दोन मार्गांवर रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर सिग्नल यंत्रणा, अभियांत्रिकी कामांसाठी, ओव्हर हेड वायरच्या देखभाल-दुरुस्तीसाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवारी म्हणजेच दोन्ही सुट्ट्यांच्या दिवशी मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने मुंबईकरांची मोठी गैरसोय होणार आहे.





