Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Local : मुंबईत वादळी पावसाने ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत; ठाणे, घाटकोपर स्टेशनवर...

Mumbai Local : मुंबईत वादळी पावसाने ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत; ठाणे, घाटकोपर स्टेशनवर तुडूंब गर्दी, नोकरदारांचे हाल

Mumbai Local : मुंबईत वादळी पावसाने ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत; ठाणे, घाटकोपर स्टेशनवर तुडूंब गर्दी, नोकरदारांचे हाल

[ad_1]

Mumbai Local Train Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने आज मुंबई, ठाणे व  नवी मुंबईला झोडपून काढले. मुंबईत पावसाबरोबरच धुळीचे वादळ आल्याने सर्वत्र धूळच धूळ दिसत होती. कल्याण, डोंबिवली या भागांत भरदुपारीच काळे ढग दाटून आल्यानं दिवसाच रात्र झाल्याचे वाटत होते. जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने मुंबईकरांची चांगलीच दैना उडवली. मुंबईत घाटकोपरमधील छेडानगर भागात एका पेट्रोल पंपावर १२० फुटी होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात १०० जण अडकले होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला तर वडाळा भागात पार्किंग लिप्ट कोसळून १० गाड्यांचे नुकसान झाले. त्याचबरोबर मध्य रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ऑफिसमधून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे चांगलेच हाल झाले. घाटकोपर, ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तुंडून गर्दी दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments