Mumbai Indians : मुंबई इंडियन्स संघात दिलशान मदुशनाकाऐवजी क्वेना मफांका | पुढारी

0
5
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स संघात दिलशान मदुशनाकाऐवजी क्वेना मफांका | पुढारी









मुंबई; वृत्तसंस्था : आगामी आयपीएल स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सने दुखापतग्रस्त दिलशान मदुशनाकाऐवजी पदार्पणवीर दक्षिण आफ्रिकन मध्यमगती गोलंदाज क्वेना मफांकाची निवड केली आहे. 23 वर्षीय मदुशनाकाला बांगला देशविरुद्ध वन डे मालिकेदरम्यान धोंडशिरेची दुखापत झाली आणि यामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. मदुशनाकाला मुंबई इंडियन्सने 4.6 कोटी रुपयांच्या बोलीसह करारबद्ध केले होते. गतवर्षी वन डे विश्वचषक स्पर्धेत त्याने 9 लढतीत 21 बळी घेतले होते. (Mumbai Indians)

17 वर्षीय मफांका यंदा यू-19 विश्वचषक स्पर्धेत 9.71 च्या सरासरीने 21 बळी घेतल्यानंतर विशेष प्रकाशझोतात आला. माजी जलद गोलंदाज लन डोनाल्डने मफांकाच्या जलद गोलंदाजीची यापूर्वी अनेकदा प्रशंसा केली आहे. मफांका प्रतितास 140 कि.मी. वेगाने तळपायाचा वेध घेणारे भेदक यॉर्कर टाकण्यात तसेच डेथ ओव्हर्समध्ये नियंत्रित टप्प्यावर मारा करण्यात लक्षवेधी योगदान देईल, असे मुंबई इंडियन्सने म्हटले आहे. गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा व संघातील आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहसह ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मफांकाला मिळेल. हा अनुभवही त्याच्यासाठी मोलाचा ठरेल, असे त्यांनी पुढे नमूद केले.

हेही वाचा :













Source link