Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचा ४२ किलोमीटरचा भाग गणेशोत्सवापूर्वी खुला करणार; NHAIचे लक्ष्य

0
16
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचा ४२ किलोमीटरचा भाग गणेशोत्सवापूर्वी खुला करणार; NHAIचे लक्ष्य


NHAI अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीला सुप्रीम टोलवेज प्रायव्हेट लिमिटेडला २०११ मध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या संपूर्ण ८४ किमी (पनवेल ते इंदापूर) बांधकामाचे वर्कऑर्डर देण्यात आले होती. हे काम २०१४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजण होते. मात्र, भूसंपादनाच्या अडचणी दूर करून देखील आर्थिक अडचणीमुळे हे काम रखडले होते. या कामासाठी कंत्राटदाराला ५५० कोटी रुपयांची आर्थिक मदत देखील देण्यात आली आहे. टप्पा क्रमांक एक मधील पनवेल ते कासू या ४२ किमी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. तर टप्पा २च्या नियोजित रस्त्याच्या केवळ २० किमी हे काम पूर्ण झाल्याने रद्द करून हे काम दुसऱ्या कंत्राटदाराला देण्यात आले होते.



Source link