
Mumbai Railway Station Fire: मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकाच्या कँटिनमध्ये आग लागल्याची घटना उघडकीस आली. लोकमान्य टिळक टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ असलेल्या कँटीनमध्ये ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.





