Mumbai crime : दारूसाठी पैसे न दिल्याने दांडक्याने मारहाण करत पत्नीची हत्या, मालाडमधील घटना

0
20
Mumbai crime : दारूसाठी पैसे न दिल्याने दांडक्याने मारहाण करत पत्नीची हत्या, मालाडमधील घटना


पोलिसांनी सांगितले की, मोईनुद्दीनला दारूचे व्यसन होते व काहीच कामधंदा करत नव्हता. मृत महिला पैसे कमवून घर चालवत होती. पती तिला मारहाण करून दारूसाठी पैसे घेत होता. परवीनने पैसे देण्यास नकार दिल्यास तो तिला बेदम मारहाण करत असे. गुरुवारी मोईनुद्दीनने परवीनने दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, तिने त्याला नकार देताच संतापलेल्या मोईनुद्दीनने तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. डोक्यात वर्मी मार लागल्याने परवीनचा जागीच मृत्यू झाला. 



Source link