Mumbai Air Pollution : मुंबईतील खराब हवेमुळं मोदी सरकारही चिंतेत, केंद्राची टीम राज्यात येणार

0
19
Mumbai Air Pollution : मुंबईतील खराब हवेमुळं मोदी सरकारही चिंतेत, केंद्राची टीम राज्यात येणार


बीएमसी काय करतेय?

मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेनंही पावलं उचलली आहेत. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या उद्योग-व्यवसायांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. बिल्डर आणि कंत्राटदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक कामं वगळता इतर बांधकामं तूर्त थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पावर काम करणाऱ्या कंपनीला वायू प्रदूषण नियंत्रण नियम न पाळल्याबद्दल नोटीसही बजावण्यात आली आहे. २०२२ च्या तुलनेत यावर्षी मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी ४२ टक्क्यांनी घसरली आहे. हवेतील पीएम २.५ कण फुफ्फुसात जाऊन आरोग्यास हानी पोहोचवू शकतात, असं आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.



Source link